मोहोपाडा-

      आमचा गाव आमचा विकास"अंतर्गत सन २०२०/२१ ते २०२४/२५ या कालावधीचा पंचवार्षिक सन २०२०/२१ चा वार्षिक विकास आराखडा तयार करण्यासाठी वडगाव पंचायत समिती विभागातील ग्रामपंचायतीच्या गणस्तरीय सभेचे आयोजन वडगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते ‌.

      या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी आश्विनी जाधव,वडगाव,टेंभरी,इसांबे  आदी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मंचारी उपस्थित होते.यावेली मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी आराखडा तयार कार्यांबद्दल  माहिती सांगितली.यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवक,तलाटी,वनरक्षक,अ़गणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,महिला बचत गट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ‌.यावेली वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे,उपसरपंच सुजाता पाटील, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे,इसांबे ग्रामपंचायत सरपंच पल्लवी देवघरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे, नंदकुमार पाटील,हरेश पाटील,प्रकाश पवार, राजेश पाटील,शिवाजी शिंदे, योगिता भोईर आदी उपस्थित होते ‌या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'