पाली-बेणसे - मुस्लीम धर्मीयांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद ए मिलाद उन्नबी सण संपुर्ण देशभरात रविवारी साजरा होत असून सालबादप्रमाणे पाली सुधागडात देखील ईद सणाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पालीत हिंदू मुस्लीम ऐंक्य, सद्भावना व मैत्रीपुर्न सबंध आदर्शवत असून एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होउन गुण्यागोविद्यांने सण साजरा करण्याची परंपरा कायम राखली जाणार असल्याची भावना सुधागडवासीयांतून व्यक्त केली जात आहे. अयोध्येतील रामजन्मी भुमीतील वादग्रस्त जागेचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्छ न्यायालयाने दिला. या पाश्वभुमीवर सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

   या निर्णयाचे देशवासीयांनी स्वागत केल्याचे दिसून आले. ईदनिमित्त पाली सुधागडात बशीरभाई परबलकर यांच्या निवासस्थान असलेल्या खालचा मोहल्ला ते गांधीचौक मार्गे नुराणी जामा मस्जीद पाली या मार्गे भव्य मिरवणुक निघणार आहे. ईद सणानिमित्त नुराणी जामा मस्जीद हार फुले व रोशनाईने सजविण्यात आली आहे.सायंकाळी 5.00 वाजता जामा मस्जीदीत नमाज पठण होउन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी नेहमीप्रमाणे हिंदू मुस्लीम बांधव एकमेकांच्या गळाभेटी घेणार असून सरबत, गोड खाउचे वाटप करुन सण साजरा केला जाणार असल्याने सर्वत्र उत्साही वातावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे पालीत गणेशोत्सव, नवरात्री, मोहरम, ईद आदी सणात हिंदू मुस्लीम बांधव एकात्मता, ब बंधुभाव जोपासताना दिसतात.

   यावेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये या दृष्टीकोणातून पाली पो.नि. बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

   फोटो ओळ 1, पालीत ईद सणानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. नुराणी जामा मस्जीद फुले व रोशनाईने सजविण्यात आली आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'