कोर्लई, ता.९ मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील महाळुंगे खुर्द भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वीज पुरवठ्यात वारंवार वीज दाब कमीअधिक (लोव्हाँल्टेज) प्रमाणात होत असल्याने ग्राहकवर्ग हैराण असून याकडे महावितरण च्या अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

    मांडला ग्रामपंचायत हद्दीत महाळुंगे खुर्द भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वीजपुरवठ्यात कमीअधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे याचा घरातील पंखे, फ्रिज,टी.व्ही.व वीज मोटार यावर परिणाम झाला आहे. तर यातील काही वस्तू कमीअधिक दाबामुळे  निकामी झाल्या आहेत.याबाबत संबंधित महावितरण च्या कार्यालयात तक्रार करण्यात आली असल्याचे समजते. महावितरण च्या अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून पुरेपूर वीज पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी केली जात आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'