पनवेल

   आध्यात्मिक व धार्मिक मार्गाने हजारो भक्तांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारे प.पु हेमंतभाई जगन्नाथ  दहिवलीकर महाराज(वय ५८) यांचे नुकताच दीर्घ आजाराने चिंचवड येथे स्वर्गवास झाला, अशी माहिती ट्रस्टचे खजिनदार संतोष घोणे( निगडी) यांनी दिली.
   

    स्वर्गीय श्री हेमंतभाई यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व २ मुली आणि हजारो शिष्यगण असा परिवार आहे. प. पु हेमंतभाईंच्या स्वर्गवासाने यांच्या परीवारावर व हजारो भक्तांवर शोककळा पसरली आहे.

    प.पू सदगुरू  दत्तदास (जगन्नाथ) दहिवलीकर महाराज यांची कळंब (ता. कर्जत, जिल्हा रायगड) येथे समाधी आहे. याच ठिकाण प.पू हेमंतभाई महाराज यांनी श्री दत्तदास दहिवलीकर महाराज दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून श्री क्षेत्र कळंब देवस्थानची उभारणी केली. कळंब येथील दत्तधाम मंदीर हे प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध आहे.पुणे जिल्ह्यातील नारायणपूर देवस्थानची  स्थापना करणारे प.पू जगन्नाथ(दत्तदास) दहिवलीकर महाराज यांचे ते सुपुत्र होत. प पु हेमंतभाई कल्याण येथे निवास करत होते. मात्र कळंब येथे उभारलेल्या प्रति गाणगापूर दत्त मंदीरात दत्त महाराजांच्या सेवेत त्यांनी ३५ वर्षे सेवा केली. प पु हेमंतभाईंनी महाराष्ट्रातील हजारोंना व शिष्यांना आध्यात्मिक व भक्तीमार्गाने प्रबोधन केले व त्यातून या सर्वांचे व शिष्यांचे  जीवन संपन्न केले. दहिवलीकर महाराजांनी श्री क्षेत्र  कळंब या दत्तधाम मंदीरामधे मध्ये,नवग्रह मंदिर, शिवलिंग, भोजनकक्ष,भक्तनिवास,ग्रंथ पारायण कक्ष अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'