नेरळ,ता.9

               कर्जत तालुक्यातील पोसरी-अरवंद-सलोख या सव्वा चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. तब्बल दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यात खड्डे पडले आहेत. दरम्यान,स्थानिक ग्रामस्थांनी त्याबाबत जोरदार आवाज उठविला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता यांनी ठेकेदारी बाजू घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. 

                  तालुक्यातील कर्जत- मुरबाड रस्त्याला लागून असलेल्या पोसरी गावापासून  वरवंद- सलोख या सव्वा चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कामाची मागणी स्थानिक ग्रामस्थ अनेक वर्षे करीत होती. गेल्या काही वर्षात या रस्त्याची अवस्र्था दयनीय झाल्याने स्थानिकांना पाठीच्या दुखण्याचे आजार बळावले होते.२०१९ या आर्थिक वर्षात या रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुरी देण्यात आली होती.पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाचा दर्जा ज्याप्रमाणे राखला जात होता,त्याप्रमाणे कामे करण्यासाठी मुयख्यमंत्री ग्रामसडक योजना आणण्यात आली आहे. त्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामासाठी साधारण दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या कामाचा ठेका ठाणे येथील मे. साई सिध्दनाथ कॅन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने घेतला होता. मार्च २०१९ मध्ये कमला सुरुवात करून ठेकेदार कंपनीने मे 2019 म्हणजे  अवघ्या दोन महिन्यात सव्वा चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर डांबरीकरण काम पूर्ण केले. मात्र हि कंपनी मोठी असल्याने शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी नियुक्त केलेले अधिकारी देखील पोसरी- सलोख रस्त्याचे काम सुरु असताना फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ रस्त्र्यावर टाकण्यात येत असलेले डांबरीकरण यांचा दर्जा नित्कृष्ट असल्याचे सांगत असून देखील ठेकेदार कंपनी कोणाचेही एकात नव्हती. 

               त्यामुळे अनेक वर्षांनी बनलेल्या रस्त्याची काही दिवस पडलेल्या पावसाने अवस्था खराब झाली. जून महिन्यात शेवटच्या आठवडद्यात तर जुलै महिन्यात फार किरकोळ पाऊस होऊन देखील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अल्प पाऊस झाला असताना देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडणे,अनेक ठिकाणी रस्ता दाबून जाणे असे प्रकार घडले आहेत. यासर्व प्रकाराबाबत त्या भागातील आरवंद,साळोख आणि बारणे गावातील ग्रामस्थांनी आरडाओरड करून चांगले काम कसे होईल याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी पेण येथील कार्यालयातून साईट व्हिजिट करीत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मर्जीने ठेकेदार कंपनी रस्त्यावर डांबर टाकताना हात आखडता घेत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. पण त्या तक्रारींकडे लक्ष द्यायला अधिकारी वर्गाला वेळ मिळत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यात दोन कोटी खर्चून बांधलेला रस्त्यावर खड्डे पडले आहेत. 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'