महाड-दि.९ नोव्हेंबर 

महाड औद्योगिक वसाहती मधील प्रदुषणाचा मुद्दा संपण्या ऐवजी त्या मध्ये वाढ होत असुन त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे आढळून आले असुन हवा प्रदुषणा मध्ये प्रचंड वाढ होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचे आजार वाढले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय अधिकाNयांनी दिली आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाने बसविलेली हवेंतील प्रदुषण मोजणी यंत्रणा प्रदुषण नसल्याचे दर्शवित असल्याचा अहवाल देत असल्याने हवा प्रदुषण नियंत्रण बेभरवशी असल्याचे समोर आले आहे.

महाड तालुक्यांमध्ये सन १९८१ मध्ये औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यांत आल्या नंतर या परिसरांमध्ये औद्योगिकरण होईल आणि स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळेल असे राजकीय पुढाNयानी अमिष दाखविले,प्रत्यक्षांत येथील ओैद्योगिक क्षेत्रांमध्ये रासायनिक कारखानदारी उभारण्यांत आली आणि संपुर्ण महाड तालुक्यांतील नागरिकांचे जीवन उध्वस्थ झाले.त्याच बरोबर जमीन आणि जल प्रदुषणाचा विषय कायम वादाचा झाला आहे.या बाबत प्रदुषण नियंत्रण मंडळा कडून कारवाई केली जाते,त्या मध्ये बंदची नोटीस देखिल कांही कारखान्यांना बजावण्यांत आली परंतु राजकीय वरदहस्त असल्याने दोषी कारखानदार गुन्हा करुनही मोकाट सुटतात.रासायनिक कारखान्यांतील सांडपाणी आंबेतच्या खाडीमध्ये सोडण्याचे आदेश शासनाने महाड एमआयडीसीला देण्यांत आले आहेंत परंतु या आदेशाचे योग्य पालन करण्यांत येत नसल्याचे दिसुन येते.सध्या आंबेत खाडी मध्ये दुषित पाणी सोडले जात नसुन सव आणि ओवळे या गावा जवळ पाणी सोडले जाते.या मुळे खाडी विभाग त्याच बरोबर बिरवाडी परिसरांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेंत.याच कारणा मुळे जागतिक प्रदुषित यादी मध्ये या ओैद्योगिक वसाहतीचा डर्टी थर्टी वर्गा मध्ये समावेश करण्यांत आला होता.त्या नंतर अनेक बदल करण्यांत आले प्रदुषणावर अधिकाधिक नियंत्रण राखण्याचे प्रयत्न झाल्याने जागतिक यादींतुन नाव वगळण्यांत आले.आजही अनेक कारखानदार मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यांतील दुषित पाणी थेट सार्वजनिक नाल्यांमध्ये नदीमध्ये सोडत असल्याचे आढळून आले आहे.पाणी आणि जमीन प्रदुषण करणाNया कारखानदारांवर कारवाई करताना हवेमध्ये प्रदुषण करणाNया कारखान्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.हवे मध्ये प्रदुषण मापण्याची यंत्रणा या परिसरांमध्ये बसविण्यांत आलेली असली तरी ही यंत्रण आता कालबाह्य झाल्याने त्याचा कांही उपयोग होत नसल्याचे  दिसुन आले.या यंत्रणेच्या माध्यमांतुन हवेंमध्ये सल्फर आणि नायट्रोजन हे दोन घटन मोजले जात असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळा कडून देण्यांत आली.ज्या एजन्सीला हवेंतील प्रदुषण मापण्याचे काम दिले आहे त्यांच्या कडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हवेचे प्रदुषण नसल्याचे दाखविण्यांत आले आहे.त्या मुळे हवेंमध्ये प्रचंड प्रमाणांत प्रदुंषण होत असुन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतना सदरच्या यंत्रणे कडून मिळणाNया अहवाला विषय संशय व्यक्त केला जात आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रांमध्ये धुळ जमा करण्याचे डस्ट सप्लर बसविण्यांत आले आहेंत,या यंत्रणेने हवेंतील धुळ गोळा करुन त्यांतील सल्फर आणि नायट्र्रोजनचे प्रमाण मोजले जाते.पी.पी.एल.अग्निशामक वेंâद्र,पाणी शुध्दीकरण केद्र या तिन ठिकाणी वरील यंत्रण बसविण्यांत आली आहे.सदरची यंत्रणा स्थानिक प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या शिफारशी वरुन बसविण्यांत आले असल्याची माहिती प्रदुषण मंडळाच्या कार्यालया तुन देण्यांत आली.महाड मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला हवेंतील प्रदुषण निरिक्षण करण्याचे काम देण्यांत आले आहे,या एजन्सीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये हवे मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नसल्याचा अहवाल दिला आहे.औद्योगिक वसाहती मधील कोणत्या कारखान्यांतुन दुर्गधी वायु सोडण्यांत येतो याचा शोध घेणे कठीण असले तरी वंâपनीमध्ये कोणत्या प्रकारचे रसायनाचा वापर केला जातो या वरुन दुर्गधीचा मागोवा काढणे शक्य होत असल्याचे कांही उद्योजकांनी स्पष्ट केले.

औद्योगिक वसाहती मधील कारखानदार पहाटे आणि रात्रीच्या वेळी दुषित वायु हवेमध्ये सोडत असल्याने नजीकच्या गावांला त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते करीम करबेलकर यांनी सांगितले.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी या परिसरांतील कांही कारखानदार कायम प्रदुषण करीत असताना त्यांचयावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला,प्रदुषणा मुळे शेतीचे उत्पन्न बुडाले,या विरोधांत आपण आंदोलन करणार असलयाचे देशमुख यांनी सांगितले.

हवे मध्ये दुर्गधी पसरविण्याचे कुकर्म जे कारखानदार करीत आहेंत त्याचा तपास  करणे अवघड आहे,या बाबत शोध लावण्याची यंत्रणा  कालबाह्य झाली असल्याने नव्याने अस्तित्वामध्ये असलेली पी.एम.१० आणि पी.एम.२.५ या यंत्रणेतुन हवेंतील प्रदुषणाचा अचुकपणा अधिक प्रभावी पणे शोधणे शक्य होणार असल्याची माहिती महाड येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक आधिकारी सा.वि.औटी यांनी दिली.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'