मोहोपाडा

चौकनजीक जांभिवली गावात राहणा-या भाऊ गोमा गावङे यांचे घरात अज्ञात चोरट्यानी कपाटाच्या लाॅकरमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 174,800/- रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. शेतकरी असलेले  भाऊ गावङे  घरी नसताना त्यांच्या अज्ञात चोरट्याने  दरवाजाचे कुलूप  उघडुन घरामध्ये प्रवेश केला. बेडरूमचा दरवाजाचा  तोडुन बेडरूममधील कपाटाचे लॉकर मधुन आठ हजार रूपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.गावङे घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आले.याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे  अज्ञात चोरट्या विरोधात  भादविसं  कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि संजय बांगर हे करीत आहे.  अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.