उरण

शासकीय योजनांची अभ्यासपूर्ण अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सतर्क असायला हवेत. यासाठी सरपंचांना शासकीय योजना व  विकासनिधी संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज पागोटे येथे ग्रामपंचायत विकास निधीआराखडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आमचं गाव ,आमचा विकास हा मूलमंत्र घेबून विकास आराखडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी व्यासपीठावर जिप सदस्य विजय भोईर, पंस सदस्य दिपक ठाकूर,हिराजी घरत, सहा.गटविकास अधिकारी अंजने, देवांग, कृषी विस्तार अधिकारी प्रतिमा गोरे मॅडम,विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर हे उपस्थित होते.

विविध योजना राबबून गावाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे.त्यासाठी शासनाच्या विविध योजना व त्यासाठी किती विकासनिधी असतो त्याची सखोल माहिती सारपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांना असणे आवश्यक आहे.  असे मत जिप सदस्य विजय भोईर यांनी व्यक्त केले.
शासनाचा निधी कसा मिळवायचा याची माहिती सरपंचाला आवश्यक असून विविध योजनांची माहिती सरपंचाला माहीत असेल तर गावाच्या विकासाबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होऊ शकतो.अशी पुस्तीही त्यांनी मार्गदर्शन करतात जोडली.

पंस सदस्य यांनी मार्गदर्शन करताना सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी ज्या काही शासकीय योजना आहेत त्या अधिकारी वर्गाकडून समजावून घेऊन राबवित गावाचा विकास करावा असे सांगितले. आम्ही आमचे नेते माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी विजय भोईर व हिराजी घरत यांनी अनेक ग्रामपंचायतीत विकास कामांवर भर दिला असल्याचे सांगितले.
यावेळी नवघर जिप मतदार संघातील सरपंच उपस्थित होते.त्यामध्ये जसखारचे सरपंच दामोदर घरत,पागोटेचे सरपंच भार्गव पाटील,बोकडविराच्या सरपंच मानसी पाटील,घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर,नविन शेवेचे निशांत घरत, सोनारीच्या सरपंच पूनम कडू, नवघरच्या सरपंच आरती चोगले,पाणजेच्या सरपंच करिष्मा भोईर आदींसह अनेक उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'