हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. याच खेळाने आपल्याला ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदके मिळवून दिली आहेत.  एकेकाळी भारतीय हॉकीचा ऑलिम्पिकमध्ये दरारा असायचा. तब्बल आठ वेळा भारताने हॉकीमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवले होते.मेजर ध्यानचंद यांना तर हॉकीचे जादूगार असे म्हटले जायचे; तो भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ होता ; पण कालांतराने भारतीय संघ हॉकीमध्ये मागे पडत गेला.गेल्या काही वर्षात तर भारतीय हॉकीने आपली  लयच गमावली. कोणत्याच मोठ्या स्पर्धेत भारताला यश मिळाले नाही. मागील ऑलिम्पिक मध्ये तर भारतीय संघ तळाशी राहिला  त्यामुळे भारतीय संघ ऑलिम्पिकला पात्र तरी ठरेल की नाही अशी शंका येऊ लागली. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघाने विजेतेपद मिळवून ऑलिम्पिक मध्ये प्रवेश मिळवला. भारतीय हॉकी संघ  ऑलिम्पिकला पात्र ठरल्याने हॉकीप्रेमी चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.भारताने ऑलिम्पिकला प्रवेश मिळवत पहिली पायरी तर चढली आहे. आता भारतीय संघाचे पुढील ध्येय असायला हवे ते म्हणजे ऑलिम्पिक पदक.  ऑलिम्पिक पदक मिळवणे ही बाब अवघड असली तरी अशक्य नाही. जर भारतीय खेळाडूंनी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत घेतली तर भारत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवुही शकतो. भारतीय हॉकी संघाला मनापासून शुभेच्छा! श्याम बसप्पा ठाणेदार. दौंड जिल्हा पुणे. ९९२२५४६२९५.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'