चिपळूण 

लोकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला ‘आमदार’ केले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा देऊन चालणार नाही. तर सर्वांच्या सोबतीने आणि सहकार्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करण्याचा निर्धार आ. शेखर यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या पुढील ‘व्हिजन’विषयी आ. निकम यांनी माहिती दिली. तरुण वर्गासाठी लघुउद्योग उभारणार. चिपळूण किंवा संगमेश्वरमधील देवरुख येथे सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. मतदारसंघात पाझर तलाव बांधण्यावर आपला भर राहील. येथील एमआयडीसीत प्रदूषणविरहित नवे कारखाने सुरु झाले तर बेरोजगारी कमी होईल. यासाठी येथील जनतेने सकारात्मक विचार करून अशा कारखान्यांचे स्वागत करायला हवे, असे आवाहन केले.

कलाकार वर्गाला मानधन मिळावे, त्यांना सोयीस्कररित्या दाखले मिळावेत देवरुखमधील शासकीय आरोग्य केंद्रात दर्जेदार आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आपण आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. चिपळूण शहरातील नगरपालिकेतील सत्ताधा-यांना आपले नेहमीच सहकार्य राहील. शहरात ओपन जीमसारखी संकल्पना राबविण्यात आली पाहिजे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना आपण आणि संगमेश्वरमधील तहसीलदार यांना केल्याचे श्री. निकम यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण लवकरच समन्वय समितीची स्थापना करणार आहोत. यामध्ये डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट आदींचा समावेश राहील, असे आ. निकम यांनी सांगितले.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.