महाड-दि.४ नोव्हेंबर 

रायगड जिल्ह्यांतील वाढते औद्योगिकरणाचा परिणाम भात शेतीवर झालेला असताना गेल्या पंधरा दिवसा पासुन वेळी अवेळी कोसळणाNया पावसामुळे हाता तोंडाशी आलेले भाताच्या पिकावर त्याचा परिणाम झाला असुन पावसामुळे संपुर्ण रायगड जिल्ह्यासह महाड पोलादपुर तालुक्यांमध्ये भाताच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यांत येणार असल्याचे महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले. तालुक्यांतील शेतकरी उध्वस्त झालेला असल्याने शेतकNयांना नुकसान भरपाई देण्यांत यावी अशी मागणी केली जात असताना ज्या शेतकNयांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे त्यांच्या शेताचे त्वरीत पंचनामे करण्यांत यावेंत असे आदेश महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेंत.

चार महिने पावसाचे संपलेले असताना पावसाचे प्रमाण कमी होण्या ऐवजी दिवसे दिवस वाढतच आहे. महाड तालुक्यांतील भात शेतीचे प्रचंड नुकसा झाले आहे.रायगड जिल्हा म्हणजे भाताचे कोठार ओळखले जात होते परंतु वाढत्या औद्योगिककरणामुळे शेतीचे प्रमाण कमी झाले आणि  स्थानिक शेतकरी उध्वस्त झाला आहे.कारखानदारी वाढल्याने शेत जमीनीचे क्षेत्र कमी झाले,त्याचा परिणाम भात पिकावर झाला,कोकणांमध्ये भाताचे पिक प्रमुख उत्पन्न असल्याने यावर शेतकरी आपला उदरनिर्वाह चालवित असतो परंतु परतीच्या पावसामुळे बहूतांशी भात शेती उध्वस्त झाल्याने महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील शेतकरी अर्थिक संकटामध्ये सापडला आहे.शासनाच्या पाहाणी प्रमाणे महाड तालुक्यांमध्ये २० गावांतील १२० हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले असुन आता पर्यत ८० हेक्टर क्षेत्रांतील नुकसान ग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्यांत आले आहेंत.त्याच प्रमाण पोलादपुर तालुक्यांतील २६ गावे बाधीत असुन यांतील ४०० हेक्टर बाधीत क्षेत्र आहे. १८३ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रांमध्ये तलाठी आणि ग्रामसेवक शेती नुकसानीचे पंचनामे करीत असुन आता पर्यत १ हजार ३९ हेक्टर क्षेत्रांतील भात शेती नुकसानीचे पंचनामे करण्यांत आले आहेंत.उद्या संध्याकाळ पर्यत सर्व पंचनामे पुर्ण करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यांत आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार म्हणाले.

या वर्षी पावसाचे आगमन उशीराने झाल्याने शेतीचे कामे देखिल उशीराने सुरु करण्यांत आली.दरवर्षी जुनच्या सात तारखेला सुरु होणारा पावसाळा यावर्षी तब्बल दिड महिन्याने सुरु झाला.त्या नंतर पावसाचे प्रमाण वाढले आणि शेतीला धोका निर्माण झाला.परंतु जो पर्यत शेता मध्ये पिक उभे आहे तो पर्यत पिकाला धोका नाही असे गोंडाळे गावांतील शेतकरी राजा खेडेकर म्हणाले.परंतु हळवे पिक तयार झालया नंतर कापणी वेळे मध्ये केली नाही तर पिक गळून जाण्याची भिती आहे. अनेक शेता मध्ये पिक उभ्ज्ञे असलयाचे दिसते परंतु भाताचा दाणा तयार झाल्या नंतर तो जमीनीवर पडण्याची शक्यता असते.वेळेंत कापणी केली तर पिक हाताशी लागते अन्यथा नुकसान होते अशी माहिती राजा खेडेकर यांनी दिली. साधारण दसरा सणा पर्यत भाताचे पिक तयार होते आणि दिवाळीच्या मध्यावर कापणीला सुरवात होते परंतु या वर्षी परतीच्या पावसाचा फटका जबरदस्त बसल्याने तालुक्यांतील सत्तर टक्या पेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाल्याचा प्रार्थमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.महाड तालुक्यांमध्ये १ हजार ४०० हेक्टर क्षेत्रा मध्ये भाताचे पिक घेतले जाते.ऑक्टोबर महिन्यांत भाताचे पिक शेतकNयांच्या हाता मध्ये आल्या नंतर शेताच्या बांधावर कडधान्याची लागवड केली जाते परंतु पावसामुळे या वर्षी लागवड करणे शक्य झाले नाही.एकीकडे भाताच्या पिकाचे नुकसान तर दुसरी कडे कडधान्य पिकाचे नुकसान असे दोनही बाजुने शेतकNयांचे नुकसान झाले असुन महाड पोलादपुर तालुक्यांतील शेतकNयांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यांत यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी केली आहे.तालुक्यांतील शिवथर पंचक्रोशीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असुन पंचनामे करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असल्याचे कृषी सहायक आर.एच.गुंड यांनी सांगितले.अद्याप पाऊस सुरुच असल्याने पंचनाम्याच्या कामांमध्ये अनेक अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाड तालुक्यांतील बिरवाडी, निगडे, वरंध, माझेरी, शिवथर, वाळण, मांघरुण, वाघेरी,पाने, पंधेरी, दहिवड, वाळी,रानवडी त्याच प्रमाणे दासगाव, वहूर, तुडील, सापे, नडगाव, रावढळ, दाभोळ, टोळ, वहूर, वेंâबुर्ली, गांधारपाले, मोहोप्रे, आमशेत, आचळोली, खेर्डी, नांदगाव, नाते, कोळोसे, काचले, लाडवली, कोंझर, मांडले,पारवाडी,पाचाड,सांदोशी,करमर,कावले,बावले इत्यादी गावांतील शेतकNयांना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने भाताच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.महाड तालुक्यांतील औद्योगिक करणामुळे पन्नास टक्या पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये भात शेती बंद झालेली असताना उरली सुरली शेती पावसामुळे उध्वस्त झाली आहे.भाताचे वर्षातुन एकदा पिक घेतले जाते त्यावर संपुर्ण वर्ष शेतकरी आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालवितो.कांही झाले तरी आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनाला देखिल शिवत नाही,अश्या कोकणांतील शेतकNया कडे शासना कडून कायम दुर्लक्षित राहीला आहे.शेतकNयाला तातडीने भरपाई देण्यांत यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य संजय कचरे,जितेंद्र सावंत,पंचायत समितीचे सभापती दत्ता फळसकर,उप सभापती श्रीमती सिध्दी खांबे,पंचायत समिती सदस्य श्रीमती सपना मालुसरे,सुहेल पाचकर,सदानंद मांडवकर यांनी केली आहे.

अवश्य वाचा