मोहोपाडा

      यावर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली शेती शेतकऱ्यांना सुखद करणारी होती.मात्र परतीच्या अवेली पावसाने बहरलेली भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन गरीब शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रसायनी पाताळगंगा परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

    दिवालीत विश्रांती घेत अवकाली पावसाने पुन्हा रायगडकरांना चांगलेच झोडपून काढले आहे.कापलेल्या पिकाला कोंब आल्याने हाताशी आलेली पिके गमवावी लागल्याने शेतकरी चिंतेत आहे.अवकाली पावसाने शेतकऱ्यांची भातशेती व पिकांचे नुकसान झाले तरी शासन दरबारी शेतक-यांची दखल घेण्यास उशीर होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.कृषी विभागाकडून भातशेतीचे पंचनामे सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांनी शेतीत केलेला खर्च सुटेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.त्यातच भात पिकाला कोंब आल्याने पुढल्या वर्षी भातशेती कशी करायची हा प्रश्नही बलिराजाला सतावत आहे.पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी चावणे विभागातील शेतकरी संघटनेचे किरण माली यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देवून संताप व्यक्त केला होता.

      परतीच्या पावसाने कासप,सवणे,जांभिवली, चावणे,कांबे,चांभार्ली, आंबिवली,तुराडे,गुलसुंदे व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सदर बाबत तलाठ्यांना शेतकऱ्यांच्यावतीने किरण माली यांनी वारंवार माहिती देवूनही  प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते.यावेली किरण माली यांनी चावणे विभागातील शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देताच कराडे खुर्दं तलाटी सजाचे वाघिलकर , कोतवाल रवि घरत यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कासप मरीआई मंदिराच्या सभामंडपात शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू केले आहेत.रसायनी व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे किरण माली यांनी केली आहे.

अवश्य वाचा