खेड 

या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण मच्छीमारांच्या संकटामध्ये पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही दापोली मंडणगड खेड तालुक्याचे नूतन आमदार योगेश कदम यांनी यावेळी हर्णै येथे बोलताना दिली. क्यार वादळात ज्या मच्छीमारांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीची मदत म्हणून शिवसेना पक्षातर्फे रोख रक्कम शनिवारी देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्रात व किनारपट्टीलगत असणाऱ्या भागाला क्यार वादळाचा फटका चांगलाच बसला आहे. त्यात हर्णै बंदर हे माझ्या दापोली मतदार संघातील मासेमारी उद्योगासाठी प्रख्यात बंदर समजले जाते. आणि या बंदरातील मच्छीमारांच्या ४० ते ५० छोट्या होड्या या वादळात वाहून गेल्या आहेत. त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीनच परंतु मी या तालुक्याचा आणि शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून आज ही तातडीची मदत म्हणून प्रत्येकी ५००० रुपये सुपूर्त करत आहे. याप्रमाणेच शिवसेना पक्ष कायम या मच्छीमार बांधवांच्या पाठीशी कायम राहील आणि निव्वळ जेटी नसल्याकारणाने मच्छीमारांचे हे एव्हढे नुकसान झाले आहे. त्यामुळे जेटी प्रकल्प लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यासाठी माझे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; अशी मी ग्वाही देतो; असे योगेश कदम यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या क्यार वादळाचा हर्णै बंदरातील मच्छीमार बांधवांना जबरदस्त फटका बसला. त्यामध्ये महसूल खात्याच्या पंचनाम्यानुसार ७३ मच्छीमारांच्या फायबरच्या छोट्या होड्या (डिंग्या) या वाहून गेल्या. प्रत्येक होडीची किंमत सुमारे ८० हजाराच्या घरात आहे. सुमारे या मच्छीमारबांधवांचे ४० लाख ८० हजार इतके नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान तालुक्याचे आमदार योगेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी करून मच्छीमारबांधवांना भेट दिली. त्यावेळी शासनाकडे आपण स्वतः शिफारस करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नात राहू तसेच शिवसेना पक्षाकडून प्रत्येक नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवाला ५०००/- रोख देण्यात येण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज त्या सर्व नुकसानग्रस्त ७३ मच्छीमार मदत देण्यात आली.

खेड तालुक्यामध्ये शेतीच्या नुकसाना संदर्भात सर्वे केला असता जवळजवळ १५० हेक्टर भातशेतीच नुकसान झाले आहे. आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता येत्या दोन ते तीन दिवसात या तीन तालुक्यांचा नुकसानाचा सर्वे होऊन पंचनामे होतील हे सर्व रिपोर्ट मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवले आहेत. अजून दापोली मंडणगड विभागातील शेतीच्या नुकसानाचे सर्व्हे व्हायचा आहे. काही दिवसांपूर्वी आलेलं क्यार वादळ आणि नुकतंच शांत झालेलं चक्रीवादळ यामुळे माझ्या या मतदार संघामध्ये प्रचड नुकसान झालेले आहे. तेंव्हा आम्ही सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली.

या कार्यक्रमाला आण्णा कदम, शैलेश कदम, भगवान घाडगे, निलेश शेठ, राजेंद्र पेठकर, सुनील दळवी, रोहिणी दळवी, अंकुश बंगाल, महेश पवार, सुनील आंबूर्ले, बाळकृष्ण पावसे, गोपीचंद चोगले, असलम अकबानी, सोमनाथ पावसे, किरण दोरकुळकर, यशवंत खोपटकर, हेमंत चोगले, गणेश चोगले, संजना गुरव, नईम हुनेरकर, आदी हर्णै पाजपंढरी परिसरातील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा