बेळगाव,दि.३

             बेळगावात वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीयांनी छट पूजेचे आयोजन केले होते.अनगोळ येथील तलावाच्या काठावर छट पूजा करण्यात आली.सुहासिनी मोठ्या संख्येने अनगोळा तलावाच्या काठावर जमले होते.ऊस बांधून पूजेची मांडणी करण्यात आली होती.महिलांनी सूर्याला अर्घ्य देऊन प्रार्थना केली.छट पूजेमुळे अनगोळ तलावाच्या काठावर मोठी गर्दी झाली होती.

               शहर आणि परिसरात उद्योग,नोकरीच्या निमित्ताने उत्तर भारतीय मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत.त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ते छट पूजेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. मात्र यावर्षी प्रथमच सामूहिक छट पूजेचे आयोजन केले होते.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.