खेड 

मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे परिसरातील चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी संपादित झालेल्या जागांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण ५ नोव्हेंबरपासून हटवले जाणार आहे. यासाठी जादा पोलीस कुमकही तैनात करण्यात येणार आहे. ही अतिक्रमणणे हटल्यानंतरच चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या ४४ कि.मी अंतरापैकी २२ कि.मी अंतरापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. लोटे परिसरातील चौपदरीकरणात संपादित झालेल्या जागांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व पोलीस यंत्रणेने अतिक्रमण केलेल्यांना तातडीने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना करत २० सप्टेंबरपर्यंत डेडलाईन दिली होती. याचदरम्यान, सुचनांचे सत्वरतेने पालन न केल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्याच्या इशारा दिला होता.

महामार्ग चौपदरीकरणातील भरणे व लोटे परिसरातील चौपदरीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. याच परिसरात बहुतांश ठिकाणी अडथळयांचा स्पीडब्रेकर उभा ठाकल्याने चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली होती. त्यातच सततच्या पावसाचीही खोडा पडला होता. मात्र, या परिसरातील चौपदरीकरणाचे काम पूर्णत् वास नेण्यासाठी ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अद्ययावत यंत्रणा तैनात केल्या आहेत. मात्र चौपदरीकरणात संपादित जागांवर अतिक्रमण करण्यात आल्याने अडसर निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाºयांनी पुन्हा लोटे परिसरात जाऊन संबंधितांना बांधकामे तातडीने हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. ५ नोव्हेंबरपासून परिसरात बुलडोझर फिरवून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी महामार्गावरून ये-जा करणा-या वाहनांसाठी सर्व्हिस रोडही तयार करण्यात आला आहे.

अवश्य वाचा