चिपळूण 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने आयोजित ४ थे पर्यावरण संमेलन १ ते ३ नोव्हेंबर रोजी हॉटेल आम्रबन परिसर, परशुराम, चिपळूण येथे संपन्न होत आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आज सायंकाळी राज्यभरातील निमंत्रित पर्यावरण प्रेमी चिपळूणला दाखल होणार आहेत.

ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था संमेलनाचे संयोजक आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध जल आणि देवराईतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये उपस्थित राहणार आहेत. मंडळाची यापूर्वीची तीनही संमेलने राळेगणसिद्धी येथे अण्णासाहेब हजारे यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून गतवर्षी मंडळाशी संबंधित राज्यातील पर्यावरणप्रेमींनी भूतान आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यशस्वी केला होता. 

संमेलनाचे उद्घाटन समारंभ शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वा. या वेळेत होईल. या संमेलनास उद्घाटक म्हणूनमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन (भा.प्र.से.), संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध जल आणि देवराईतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेसदस्य-सचिव श्री. ई. रविंद्रन, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूणचे अध्यक्ष श्री. भाऊ काटदरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेजनसंपर्क अधिकारी श्री. संजय भुस्कुटे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माजीमहाव्यवस्थापक श्री. विजयकुमार ठुबे, राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाचे वित्तिय सल्लागार श्री. राज देशमुख, स्वागताध्यक्ष श्रीराम रेडिज, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र श्री. आबासाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत. मंडळाशी संबंधित आणि पर्यावरण क्षेत्रात गेली २५ वर्षे योगदान देणाऱ्या सौ. प्रियावंदा तांबोटकर (उरण-रायगड) आणि सौ. नूतन विलास महाडिक (चिपळूण) यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संमेलनात प्लास्टिक मुक्ती, वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग : उपाय आणि कृतिशीलता, महापूर : उपाय आणि कृतिशीलता, वृक्षारोपण करणाऱ्यांना कार्बन क्रेडिट या विषयावरील महत्वपूर्ण ठराव संमत होणार आहेत.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.