खेड 

शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसवण्यासाठी भारतीय वायु सेना दलाकडून प्राप्त झालेल्या फायटर विमान डिसेंबर अखेर उद्यानात बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यादृष्टीने सद्यस्थितीत विमान बसवण्यासाठी बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याकडे विशेष लक्ष केंद्रीत करत डिसेंबर अखेरपर्यंत विमानाचे लोकार्पण करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिवतर येथील जवानांनी पहिल्या व दुसºया महायुध्दात केलेल्या शौर्याची गाथा पुढील पिढीला व्हावी, याकरीता गतवर्षी जून महिन्यात वायू सेनादलातील टी.टी.एल., एच.पी.टी, ३२ हे लढाऊ फायटर विमान प्राप्त झाले आहे. विमान प्राप्त झाल्याने शिवसेना व मनसेमध्ये श्रेयावरून कलगीतुराच रंगला होता. सलग दोन महिने शिवसेना-मनसेमध्ये श्रेयाची लढाई सुरूच होती. याचदरम्यान विमानाचे उद्घाटन उड्डाण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी चिपळूणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

यामुळे उद्यायानात विमानाचे उड्डाण होण्याच्या शक्यतेने सा-यांच्याच नजरा उद्यानाकडे खिळल्या होत्या. मात्र ऐनकेन कारणाने उद्यानात विमान कारणाने उद्यानात विमाण बसवण्याची प्रक्रिया लांबणीवरच पडली होती. सद्यस्थितीत मात्र फायटर विमान उद्यानात बसवण्यासाठी बांधकामास प्रारंभ झाला आहे. हे काम देखील वेगाने सुरू असून डिसेंबर अखेरपर्यंत विमान उद्यानात बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.

अवश्य वाचा