खेड 

कल्याण रेल्वे स्थानकावर तिकिट तपासणी करत असताना एका गर्दुल्याच्या तावडीत सापडलेल्या ४ वर्षिय बालिकेला तिकिट तपासणी।स नागेश बी.सकपाळ यांनी तिचे प्राण वाचवत आई-वडिलांच्या स्वाधिन केले. अधिका-याच्या सर्तकतेमुळे ४ वर्षिय बालिका आपल्या आई-वडिलांपर्यत पोहचण्यात यशस्वी झाली.

खेड तालुक्यातील सात्वीणगावचे असलेले तसेच खेड तालुका बौध्द समाज सेवा संघाच्या मुंबई उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले नागेश बी. सकपाळ हे मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मुख्य तिकिट निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकात आपल्या सहका-यासमवेत गोदान एक्सप्रेस ची तिकिट तपासणी करण्यासाठी निघाले असता स्थानकावरील मुख्य पुलावर एका कोप-यात बसलेल्या गर्दुल्याजवळ एक बालिका आढळून आली. त्यांनी पुढे न जाता मागे वळून त्या गर्दुल्याला हटकत त्याला जाब विचारला असता माझीच मुलगी असल्याचे त्याने उत्तर दिले. मात्र त्याच्या उत्तराने सकपाळ यांचे समाधान झाले नाही. कारण गर्दुल्याच्या अंगावरील कपडे आणि बालिकेच्या अंगावरील कपडे यांचा कोणताही संबंध दिसून येत नसल्याने त्यांचा संशय खरा ठरला.

त्या गर्दुल्याच्या बाजूलाच बसलेल्या एका महिलेने ती बालिका त्याची नसल्याचे सांगितल्या नंतर त्या गर्दुल्याने घटनास्थळावरून लागलीच पलायन केले. त्यानंतर त्या बालिकेला नागेश सकपाळांनी स्वत:च्या ताब्यात घेत स्थानकावर त्या बालिकेच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला. ब-याच तासांच्या अवधीनंतर त्या बालिकेचे आई-वडिल मिळून आले. त्यानंतर त्या बालिकेला नेमके तेच आई-वडिल आहेत याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत