बेळगाव,दि.३०

              पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने परिसरातील लोकांनी पेट्रोल गोळा करण्यासाठी तोबा गर्दी केल्याची घटना बेकवाड येथे घडली.खराब रस्त्यामुळे खड्डे चुकवत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून टँकर पलटी झाला.

                   खानापूर तालुक्यातील बेकवाड गावाजवळ पेट्रोल नेणारा टँकर उलटल्याने एकच गोंधळ उडाला.पेट्रोल टँकर उलटल्याची घटना बेकवाड आणि आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली .लोकांनी पेट्रोल गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली.घागरी,कॅन,डबे,बाटल्या आदी मिळेल ते साठवण्याच्या वस्तू घेऊन लोकांनी गर्दी केली.टँकरमधून वाहत असलेले पेट्रोल लोकांनी गोळा केले.पेट्रोल टँकर उलटल्याचे वृत्त पोलीस आणि अग्निशामक दलाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोल गोळा करण्यात गुंतलेल्या लोकांना पळवून लावले.सुदैवाने पेट्रोल रस्त्यावरून वाहत असताना देखील कोणताही अनर्थ घडला नाही.

अवश्य वाचा