बेळगाव,दि.२९-दिवाळीच्या दिवसात किल्ला करण्याची परंपरा बेळगावमध्ये अनेक वर्षांपासून प्रचलित आहे.दिवाळी जवळ आली की बच्चे कंपनी आणि तरुणाईला किल्ले करण्याचे वेध लागतात.रायगड,प्रतापगड,राजगड,पन्हाळा,मुरुड जंजिरा आणि देशभरातल्या प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब बनविल्या जातात.बेळगावमध्ये किल्ले करणारे कुठेही गेले तरी किल्ला करण्याची परंपरा विसरत नाहीत हेच ऑस्ट्रेलियातील रोहित आंची यांनी दाखवून दिले आहे.

               बेळगावहून ऑस्ट्रेलियात गेलेल्या नोकरीसाठी गेलेल्या या इंजिनियरने जपली आहे किल्ल्याची परंपरा.मेलबर्न येथील आपल्या घरात त्यांनी यावर्षी सिंधुदुर्ग मधील विजयदुर्गाची प्रतिकृती साकारले.

              गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियात किल्ला उभारण्याची परंपरा रोहित आंची यांनी सुरू केली आहे.बेळगावात असताना दिवाळीच्या दिवसात ते किल्ला करायचे.त्यामुळे त्यांनी मेलबर्न येथील आपल्या घरात किल्ला साकारायला सुरुवात केली.

               आता किल्ला करताना माझी दोन्ही मुलेही मला मदत करतात.किल्ला करताना शिवाजी महाराजांचा इतिहास,किल्ल्यांची माहिती मी मुलांना सांगतो.त्यामुळे आपल्या परंपरा आणि इतिहास पुढील पिढीला समजण्यास मदत होते असे रोहित आंची यांनी सांगितले.

                प्लास्टर आणि थर्मोकोलचा वापर करून किल्ला तयार केलाय.किल्ला तयार करण्यासाठी एक आठवडा लागतो.शिवाजी महाराज आणि मावळे भारतातून आणले आहेत अशी माहिती रोहित यांनी दिली.रोहित यांना किल्ला तयार करण्यासाठी त्यांची पत्नी पूनम ,मुलगा साहस आणि मुलगी सायली यांनी मदत केली.

अवश्य वाचा

सारे काही पाण्यासाठी..,