कानठळ्या बसविणारे ते प्रचंड फटाक्यांचे आवाज, धूराने गच्च भरणारे वातावरण, कचर्‍याने भरणारा परिसर म्हणजेच दिवाळी अस जणू आजवरच समीकरण, मोठमोठ्या फटाक्यांच्या आवाजाने, प्रचंड वातावरणातील धूराने आजारी, वृद्ध, दमेकरी यांच्या त्रासाकडे  फटाक्यांची आतिषबाजी साजरी करताना आठवण सुद्धा होत नव्हती. परंतु या दिवाळीत मोठमोठ्या शहरातून नव्हे राज्यभराचा विचार करता प्रचंड आवाजाचे फटाके पूर्वीच्या मानाने फुटले नाहीत, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा वापर तसा कमीच झाला. आणि नागरिकांना फटाक्यांचा त्रास ही कमी जाणवला ही या दिवाळीची आनंदाची बाब म्हणावी लागेल. लोकांना ध्वनी प्रदूषणाचे, वायु प्रदूषणाचे घातक परिणाम ध्यानी यायला लागलेत ही सुद्धा फार मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. या दिवाळीत भावी पिढीला मोठ्यानी चांगला धडा घालून दिलाय असही म्हटल्यास वावगे होणार नाही. थोडक्यात काय  कानठळ्या बसविणारे फटाके फोडले म्हणजेच दिवाळी साजरी होते असे नव्हे याची समज, उमज येणे महत्वाचे आहे या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी खरच हॅप्पी दिवाळी होय. समाधानी दिवाळी होय.

पुराच्या तांडवाने सर्वस्व गमावून केवळ आणि केवळ डोळ्यात आसव ठेऊन जाणारा पुर तर दुसरीकडे दाहकता देणारा दुष्काळ या जीवांचा विसर न पडता  एक सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने, दिवाळीच्या निमित्ताने मदतीचा हात देणार्‍या अनेक सामाजिक संस्था, व्यक्ति यांचेही कार्य मोलाचेच आहे. 

अवश्य वाचा