बेळगाव विमानतळावर आता अनेक कंपन्यांनी आपली विमानसेवा सुरू केली असून त्याला प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम लाभत आहे.शहरातून विमानतळापर्यंत बससेवा सुरू करा अशी मागणी बऱ्याच  दिवसापासून केली जात होती.त्यामुळे सांबरा विमानतळ ते बेळगाव अशा बससेवेचा शुभारंभ दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.

                परिवहन मंत्री आणि उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी या नूतन बससेवेचा शुभारंभ ध्वज दाखवून केला.यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी ,जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी आणि पोलीस आयुक्त लोकेशकुमार उपस्थित होते.सांबरा विमानतळावरून ही बस राणी चन्नमा चौक तेथून धर्मवीर संभाजी चौक मार्गे उद्यामबाग पर्यंत धावणार आहे.विमानसेवा बऱ्याच शहरांना सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे.टॅक्सी भाडे खूप होत असल्यामुळे विमानतळापर्यंत बससेवा सुरू करा अशी मागणी बऱ्याच दिवसापासून होत होती.

अवश्य वाचा