"नुकसान भरपाई साठी म्हसळा तालुक्यातील शेतकऱयांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा".-- परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अथोनाथ नुकसान केले आहे. त्या नुकसानीकडे शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी एकत्र येऊन तहसीलदार मार्फत मा.मुखमंत्री यांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी हे ग्रामीण रुग्णालयापासून ते म्हसळा तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चासाठी   शेतकरी रामभाऊ लोणाशीकर, विकास पोटले, महादेव म्हात्रे, महादेव कांबळे ,शांताराम कोबनाक, वैभव नाक्ती, सचिन काप,किरीटन शिगवण, मंगेश मुंडे, रामचंद्र बोर्ले, महादेव कापडी, अनंत कोबनाक विनोद शिगवण , मनोज गिजे, तुकाराम जाधव, देवजी चाचले, अंबाजी कासरुंग, अनंत चाचले, दिनेश सावंत, सुनील पोटले भिकू माळी, तुकाराम खोत,  चंद्रकांत भगत, सुभाष गिजे,किसन पवार, देवजी चव्हाण, नथुराम शिंदे , रमेश घडशी, प्रदीप शितकर, प्रकाश लोणाशीकर, महेंद्र धामणे, दिपेश जाधव, विश्वनाथ पवार, अनंत अंबावले, अब्दुल हुर्जुक, नारायण धुमाळ, उमेश पवार तसेच   तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेतकर्याची शेती मधील  भात, नाचणी, वरी, तूर, उडीद, चवळी तसेच भाजीपाला पिके तयार झाली असून परतीच्या पावसाने गेल्या ०८ दिवसापासून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शेतीचे अतोनात नुकसान झाले असून सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच धान्यांना पुन्हा कोंब आले असून शेतकऱ्याच्या हातात १० टक्के सुद्धा उत्पन्न येण्याची शक्यता नाही.  परंतु आपण गेल्या ०८ दिवसापासून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आपल्या तालुक्यातील शेतकरी हा एकबार खरीपाच पिक घेत असतो व त्यावर मुख्य उपजीविका करीत असतो. असे असताना आपण आपल्या स्तरावरून संबंधित प्रशासनाला शेकऱ्यांच्या शेतातील पिक त्याची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्यास आदेश द्यावे  व संबंधित शेतकऱ्याला दर एकरी सरसकट ३५,००० रक्कम त्वरित अदा करावी. नाही तरी ओला दुष्काळ जाहीर करणे बाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच ज्या प्रमाणे आंबा, काजू अशा नगदी पिकांना जे नुकसान भरपाईचे निकष लावता त्याच्यापेक्षा या पिकांना विशेष भरपाईचे निकष लावून  करून जास्तीत जास्त नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, त्याच बरोबर गुरांसाठी असलेला भाताचा चारा तो देखील भिजून खराब झालेला आहे. तरी त्याची देखील व्यवस्था प्रशासना मार्फत करावी अशा प्रकारचा निवेदन तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी म्हसळा तहसील कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामे झाल्यास शासन निधी मिळण्यास सोपे जाणार आहे. ह्या मोर्च्याच्या आयोजनामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा योग्य तो मोबदला मिळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर त्वरित पंचनामे करण्याची विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.

अवश्य वाचा