संकेश्वर बस स्थानकाच्या वसतिगृहात जळून खाक झालेला मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली .

रविवारी सकाळी काही जणांनी हा मृतदेह पाहिला. जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती वरिष्ठांना दिली.नंतर  त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला.ही घटना कळताच लोकांनी बस स्थानकाच्या वसतीगृह परिसरात गर्दी केली होती.

 मृतदेह जळून काळा ठिक्कर झाल्यामुळे मृतदेह कोणाचा आहे हे समजणे अवघड झाले आहे. व्यक्तीचा खून करून नंतर मृतदेह जाळण्यात आला आहे.ही घटना घडून पाच सहा दिवस झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.