बेळगाव,दि.२६-

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधार्थ भर दिवसा मानवी वस्तीत शिरत असल्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. वाघाने भरदिवसा हेम्मडगा गावात प्रवेश करून गोठ्यातील वासरू  ओढून नेल्याची घटना घडली आहे.

दुलभा मादार यांच्या जनावराच्या गोठ्यात वाघ शिरला आणि  गोठ्यातील वासरू  वाघाने ओढून नेले.ही घटना घडल्यावर दुलभा मादार यांनी चरायला सोडलेल्या अन्य जनावरांना आणले आणि गावकऱ्यांना जागरूक केले.

या घटनेमुळे तेथील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.गावात वन्यप्राणी प्रवेश करत असल्यामुळे लोक घाबरत असून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वन्यप्राणी भरदिवसा गावात शिरत असल्यामुळे शेतात काम करायला जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

अवश्य वाचा