चिपळूण : ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या,निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने आयोजित ४ थे पर्यावरण संमेलन १ ते ३ नोव्हेंबर रोजी हॉटेल आम्रबन परिसर, परशुराम, चिपळूण येथे संपन्न होत आहे. ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था संमेलनाचे संयोजक आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध जल आणि देवराईतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये उपस्थित राहणार आहेत. मंडळाची यापूर्वीची तीनही संमेलने राळेगणसिद्धी येथे अण्णासाहेब हजारे यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून गतवर्षी मंडळाशी संबंधित राज्यातील पर्यावरणप्रेमींनी भूतान आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यशस्वी केला होता.      

संमेलनाचे उद्घाटन समारंभ शनिवारी(२ नोव्हेंबर) सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वा. या वेळेत होईल.प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहाता येत नसल्याने पद्मभूषण अण्णा हजारे यांचा संमेलनास उद्देशून मार्गदर्शन संदेश एल.सी.डी. प्रोजेक्टरवर दाखविण्यात येईल. या संमेलनास उद्घाटक म्हणूनमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. पी. अनबलगन (भा.प्र.से.), संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध जल आणि देवराईतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेसदस्य-सचिव श्री. ई. रविंद्रन, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूणचे अध्यक्षश्री. भाऊ काटदरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेजनसंपर्क अधिकारीश्री. संजय भुस्कुटे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे माजीमहाव्यवस्थापकश्री. विजयकुमार ठुबे, राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाचे वित्तिय सल्लागार श्री. राज देशमुख, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र श्री. आबासाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत. मंडळाशी संबंधित आणि पर्यावरण क्षेत्रात गेली २५ वर्षे योगदान देणाऱ्या सौ. प्रियावंदा तांबोटकर (उरण-रायगड) आणि प्रा. सौ. उल्का कुर्णे (नाशिक) यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संमेलनात प्लास्टिक मुक्ती, वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग : उपाय आणि कृतिशीलता, महापूर : उपाय आणि कृतिशीलता, वृक्षारोपण करणाऱ्यांना कार्बन क्रेडिट या विषयावरील महत्वपूर्ण ठराव संमत होणार आहेत.

शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राज्यभरातील संमेलन प्रतिनिधी चिपळूणला पोहोचतील. रात्री उपस्थितांचे ‘वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग, महापूर, प्लॅस्टिक’ या विषयावरील अनुभव कथन होईल. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी ६ ते ७ वा. योग व प्राणायाम होईल. प्रा. तारा काब्रा, डॉ. प्रतिभा श्रीपाद यासाठी मार्गदर्शन करतील. सकाळी ८.३० ते ९.३० वा. श्रीक्षेत्र परशुराम मंदिर दर्शन, सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वा. पर्यावरण संमेलन उद्घाटन कार्यक्रम, दुपारी २.३० ते ३.१५ वा.पहिल्या सत्रात श्री. भाऊ काटदरे हे धोक्यातील वन्यजीवन आणि आपण, दुपारी ३.३० ते ४.१५ वा.च्या दुसऱ्या सत्रातनिवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जलनायकप्रशांत परांजपे हे सुगंध वसुंधरा रक्षणाचा, सायंकाळी ४.३० ते ५.०० वा. तिसऱ्या सत्रात नामवंत इतिहास अभ्यासकप्रकाश देशपांडे हे शिवकालीन पर्यावरणीय विचार, सायंकाळी ५.३० ते ६.३० वा. चौथ्या सत्रात नामवंत वन्यजीव अभ्यासक निलेश बापट हे सह्याद्रीतील वैविध्यता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. रात्री सहभागींच्या अनुभव कथनाचे दुसरे सत्र होईल.

रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ६ ते ७ वा.योग व प्राणायाम होईल. सकाळी ९.०० वाजता राज्यभरातून आलेले पर्यावरणप्रेमी गोवळकोट बंदराकडे प्रयाण करतील. सकाळी १०.०० ते ११.३० वा. वाशिष्ठी बोटिंग आणि क्रोकोडाईल सफर हा चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीतील जैवविविधता दर्शन कार्यक्रम होईल.सकाळी ११.३० ते १२.३० वा. चिपळूण शहरातील ‘लोटिस्मा’च्या अश्मयुगकालीन ठेवा असणाऱ्या कोकणातील एकमेव वस्तूसंग्रहालयासभेट, दुपारी १२.३० वा.एसआर. जंगल रिसॉर्ट धामणवणेकडे प्रयाण होईल. दुपारी २.३० वा. या संमेलनाचा समारोपश्रीराम रेडिज यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सचिव शहाजी ढेकणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, अरुण म्हाडगुत (कुडाळ), प्रा. अल्का गव्हाणे (पुणे), सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रणिता पाताडे (सिंधुदुर्ग) उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मंडळाशी संबंधित राज्यातील प्राचार्य, प्राध्यापक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, पर्यावरणप्रेमींचे सहकार्य लाभते आहे. शेषराव गर्जे, जगदीश थरवळ, विश्वास पाटील (चिपळूण), सतिश मुणगेकर (गुहागर), संतोष कडवईकर (संगमेश्वर), रणजित पाताडे (सिंधुदुर्ग)आदि कोकणातील मंडळाचे सहकारी संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. मर्यादित प्रवेश असलेल्या या संमेलनाचा मुख्य कार्यक्रम शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी असेल. यात पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता मो. ९४२२३७६४३५, ८८३०९१६७१४, ९८२३१३८५२४, ९३२५०१२२४५ येथे २९ नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्षश्री. श्रीराम रेडिज आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचेउपाध्यक्ष विलास महाडिक यांनी केले आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.