चिपळूण (प्रतिनिधी)  - कॅन्सरसारख्या आजारावरील विविध उपचार पध्दती तसेच नवीन तंत्रज्ञानाविषयी   डॉक्टरांना व्हावी याकरिता ऑन्को लाईफ  केअर कॅन्सर सेंटर, चिपळून यांच्या पुढाकाराने तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, चिपळून आणि चिपळून जनरल प्रॅक्टीक्श्नर असोसिएशन यांच्या सहकार्याने नुकतेच चिपळून येथे विशेष कॅन्सर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिपळून आणि परिसरातील १०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.

या कॅन्सर परिषदेत चर्चा, व्याख्याने, चर्चासत्र, समूह चर्चा अशा कार्यक्रमांचा समावेश असून, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरील उपचार पद्धतींचे तपशील, केमोथेरपी, कॅन्सरवरील उपचार पद्धतीतील खर्च कमी करणे, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, अवयव न काढता उपचार, जगभरातील विविध यशस्वी केस स्टडीज, जटिल केसेस, कॅन्सरवरील औषधे, आदी विविध विषयांवर परिसंवाद झाला. या परिषदेत रेडिएशन कैंसरतज्ञ डॉ करण चंचलानी  व मेडिकल(केमोथेरेपी) कैंसरतज्ञ डॉ दत्तात्रेय अंदुरे यांनी कॅन्सरविषयी सखोल माहिती दिली.

या परिषदेत ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये मेंदुपासून पायापर्यंत उद्भवत असलेल्या सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचार उपलब्ध असल्याची माहिती डॉ करण चंचलानी यांनी दिली. डीसीआरटी, आय एम आर टी,आय जी आर टी आणि एस बी आर टी सारखी सर्व प्रकारची तंत्रज्ञाने याठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी उपलब्ध तज्ञ डॉक्टर्स हे टाटा कैंसर सेंटर, मुंबई येथून प्रशिक्षण घेवूनाले असून ते याठिकाणी रुग्णाच्या गरजेनुसार रेडिएशनमधील उच्च तंत्रज्ञान वापरतात तसेच या ठिकाणी ट्यूमर बोर्ड मीटिंगमध्ये तिन्ही प्रकारचे कैंसरतज्ञ अवघड केसेस वर चर्चा करुन निर्णय घेतात अशी माहिती डॉ करण चंचलानी यांनी दिली. डॉ करण चंचलानी यांनी यावेळी रेडिएशन तंत्रज्ञानाविषयी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. कॅन्सर सारख्या रोगावर अनेक उपचार पद्धती असून, त्या अद्ययावत होत असतात. त्याचा उपयोग झाल्यास रुग्णाला फायदा होतो. त्यामुळे त्या माहितीचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. असे यावेळी डॉ चंचलानी यांनी स्पष्ट केले. 

तसेच मेडिकल कैंसरतज्ञ डॉ दत्तात्रय अंदुरे यांनी कैंसर म्हणजे क़ाय,त्याची कारणे, लक्षणे,व कैंसरचे लवकर निदान झाले व योग्य कैंसरतज्ञ यांना दाखवले तर तो पूर्णपणे बरा होवू शकतो.त्यामुळे कैंसरबद्दल भीति न बाळगता त्याच्यावर कैंसरतज्ञ यांच्याकड़ून उपचार घेणे आवश्यक आहे.चिपळून येथे कॅन्सर सारख्या आजारावरील सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्य़ सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत उपचार मोफत होत असल्याने आर्थिक दुर्बलांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

         या परिषदेला ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे  अध्यक्ष उदय देशमुख, संचालक डॉ प्रताप राजेमहाडिक, लाईफ केअर हॉस्पीटल चिपळून चे अध्यक्ष डॉ इसहाक खतीब, संचालक डॉ समीर दळवी, डॉ विष्णु माधव, डॉ सायली माधव, डॉ शमशुदीन परकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवश्य वाचा