आगरदांडा 

 मुरुड तालुक्यातील खारअंबोली परिसरातील परतीच्या पावसामुळे कापलेला भातशेतीला कोम आल्याने शेतक-याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असुन शेतकरी हवालदिल झाला आहे.  .

 कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मुरुड कृषी खात्यात अनेक शेतकरी पंचनामे करा अशी मागणी करूनसुद्धा शासन लक्ष देत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना एकत्र करून मोठा मोर्चा काढण्याचा इशारा खारआंबोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच व शिवसेनेचे  उप तालुका प्रमुख मनोज कमाने यांनी दिला आहे.

खारआंबोली परिसरातील जोसरंजन,उंडरगाव,खतिबखार या परिसरात भाताची कापणी होऊन भाताला पाण्यात भिजल्याने मोड येऊन रोपे तयार झाली आहेत. शेतकरी दुखत असताना सुद्धा कृषी खात्याचे कोणतेही अधिकारी व मुरुड तहसीलदार याना अर्ज देऊन सुद्धा कोणताही अधिकारी न फिरकल्याने शेतकऱ्यांच्या  भावना संतप्त झालेल्या असून लोकांच्या हितासाठी महाविराट मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन मनोज कमाने यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे.

. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.मुरूड तालुक्यात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसा कडकडीत ऊन पडते. सायंकाळी मात्र अचानक आभाळ भरून येऊन जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे . परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला आहे. कापणीयोग्य पीक शेतात आडवे झाल्याने शेतक-याचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.  या संदर्भात कुषिअधिकारी व तहसीलदार यांना  शेतकरी तथा माजी सरपंच- मनोज कमाने यांनी माहिती देऊन सुद्धा दुलक्ष्य करीत आहेत.आजतागात कोणत्याही अधिकारी वर्गाने या भागाला भेट न दिल्याने व शेतकऱ्यांची दखल न घेतल्याने अखेर आंबोली परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मनोज कमाने यांनी केले आहे. 

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.