बेळगाव,दि.२४

   स्वर मल्हार ,बेळगाव तर्फे कृष्णेन्द्र वाडीकर हुबळी यांच्या गायनाची दिवाळी पहाटची बहारदार बैठक संपन्न झाली . 'स्वर मल्हारची 'ही नववी बैठक होती.

  बेळगावचे सुपरिचित वकील डॉ. श्री. एस. बी. शेख आणि श्री. प्रभाकर शहापूरकर, श्री. मुकुंद गोरे व श्री .कृष्णेन्द्र वाडीकर यांच्या हस्ते बैठकीचे दीप्रज्वलन झाले.

    श्री . कृष्णेन्द्र यांनी राग नट भैरव, राग भटियार आणि भैरव भटियार, अभंग आणि नाट्यगीत तसेच कन्नड पद आणि शेवटी 'पावलो पंढरी' हा भैरवीतील  अभंग सादर करून मैफली ची सांगता केली.

   श्री.अंगद देसाई , (तबला)आणि श्री. सारंग कुलकर्णी , (संवादिनी)यांची उत्कृष्ट साथ-संगत हे बैठकीचे वैशिष्ट्य होते.

   श्रीमती रोहिणी कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. स्वर मल्हार च्या बैठकीला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत