बेळगाव,दि.२३

                खळेगावहून मदभावी मार्गे   बेळगाव बससेवा सुरू करावी असे निवेदन बेळगाव विभागीय नियंत्रणाधिकारी एम .आर. मुंजी यांना देण्यात आले. माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक बागडी यांनी सदर निवेदन आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पत्र विभागीय नियंत्रणाधिकाऱ्यांना दिले.

                    बेळगाव खळेगाव मार्गावर अनेक गावातील लोक ये जा करत असतात.पूर्वी या मार्गावर धावणारी बस बंद करण्यात आली आहे.त्यामुळे दररोज कामानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे.यासाठी खळेगाव ते बेळगाव व्हाया मदभावी अशी बस सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना कृष्णा शिंदे,कुमार पाटील आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा