बेळगाव,दि.२३

            इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने  लढा दिलेल्या कित्तूर येथील राणी कित्तूर चन्नमाच्या  कित्तूर उत्सवाला कित्तूर येथे प्रारंभ झाला.इंग्रजांविरुद्ध लढा दिलेल्या वीर राणी कित्तूर चन्नमा हिच्या स्मरणार्थ दरवर्षी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.पालकमंत्री जगदीश शेट्टर,महिला बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले,खासदार अण्णा साहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत कित्तूर उत्सवाला प्रारंभ झाला.प्रारंभी मान्यवरांनी कित्तूर राणी चन्नमाच्या  पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले.नंतर जगदीश शेट्टर यांच्या हस्ते कित्तूर संस्थानचा ध्वज फडकविण्यात आला.

               कित्तूर येथे निघालेल्या शोभायात्रेत डोक्यावर कलश घेऊन सुवासिनी सहभागी झाल्या होत्या.शोभायात्रेत धनगरी ढोल,महिला ढोल पथक,झान्ज पथक आणि चित्रविचित्र मुखवटे परिधान केलेली पात्रे मिरवणुकीत सहभागी झाली होती.मिरवणुकीत कित्तूर आणि आजूबाजूच्या गावातून आलेले हजारो लोक सहभागी झाले होते.उत्सवाच्या निमित्ताने कित्तूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

           कित्तूर राणी चन्नमाचे माहेर असलेल्या बेळगाव जवळील काकती गावात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आगमन झालेल्या ज्योतीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्वागत केले.याप्रसंगी मंत्री शशिकला जोल्ले ,खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि कित्तूर राणी चन्नमाचे वंशज उपस्थित होते.

     

अवश्य वाचा