नेरळ,ता.23

                          खरीप हंगामात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भातपिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून कशेळे मंडळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे.भातपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या शेतात कृषी अधिकारी पोहचले असून शेती शाळेच्या निमित्ताने तेथे परीक्षण केले जात आहे.

                          कर्जत तालुक्यातील कशेळे मंडळाअंतर्गत नेवाळी येथे खरीप हंगाम 2019-20 राष्ट्रीय गळीत धान्य अभियान अंतर्गत तालुका कृषि कार्यालयाच्या शेती शाळेचे नियोजन करण्यात आले होते.त्या शेतीशाळेच्या शेवटच्या टप्प्यात कृषी पर्यवेक्षक सचिन केने,कृषी सहाय्यक शिवाजी लोहकरे आणि सुदिन पाटील यांनी शेतीशाळा घेताना शास्त्रीय  पध्दतीने पीक कापणी व किड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या शेतीशाळांमध्ये भात बियाणे निवड,बीजप्रक्रीया, बीज संस्करण,चारसुत्री लागवड पध्दतींची गरज आणि त्यानंतर शेतकर्यामध्ये तांत्रिक साक्षरता विकसित करुन विविध कीड तसेच रोगावर फवारणीसाठी औषधाची फवारणी याबाबत माहिती देण्यात आली.पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची माहिती शेतकर्यांच्या प्रश्नांना वेगवेगळ्या सत्रात माहिती देण्यात आली.      

                           कृषी अधिकारी यांनी भातपिक स्पर्धेत सहभागी शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करुन आणि  वेगवेगळी निरीक्षणे घेऊन उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रकाश सापळे यांनी घरच्या घरी बनिवण्याचे प्रात्यक्षिक आणि वैभव विळ्याच्या मदतीने कापणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतीशाळेस नेवाळी येथील युवा शेतकर्यांचाही चांगलाच प्रतिसाद होता. ही शेतीशाळा कर्जत येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक सचिन केने,कृषी य सहाय्यक शिवाजी लोहकरे व सुदिन पाटील यांनी घेतली.शेती शाळेसाठी रामचंद्र भागीत,मारुती दुर्गे, चिंधू भागीत यांच्यासह नेवाळी येथील शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा