सुकेळी दि.२३

नागोठणे विभागासह सुकेळी, वाकण परिसरामध्ये सुरु असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गांत चितेंचे वातावरण पसरले आहे.

सद्यपरिस्थितीत शेतीची कामे जोरदार सुरू आहेत. नागोठणे विभागासह सुकेळी, वाकण परिसरामध्ये शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात भात कापणीला सुरूवात केली होती. कारण परिस्थिती कशीही असली तरी शेतीची कामे ही वेळेतच पुर्ण करावी लागतात. पंरतु यावर्षीच्या पावसाने मात्र अक्षरश: शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कारण भाताचे पिक पुर्णत: तयार झाल्यामुळे काही  शेतक-यांनी तर भात कापणीला सुरूवात केली पंरतु दररोज सुरूच असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर्ण भातशेती पाण्याखाली गेली आहे तर काही ठिकाणची भाताची रोपे कोलमडुन पडलेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामामध्ये खर्च केलेला पैसा ही हाती न लागताच मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

अवश्य वाचा

पोटनिवडणूक मतमोजणी सोमवारी.