नागोठणे : २२ ऑक्टो

सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे विभागात रोहव पेण तालुक्यातील नागोठणे व शिहू भागातील भातशेती वाहून गेली. शासनाने तातडीने शेतीचा पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी वरवठणे गावचे  माजी सरपंच गणपत शेठ म्हात्रे व पिंगोडे ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच संतोष कोळी तसेच शिहू येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल आणि माजी सरपंच भास्कर म्हात्रे यांचेसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. पावसाचा फटका शिहूसह चोळे, आटीवली, गांधे, मुंढाणी आणि बोरावाडी तसेच इतर आदिवासीवाड्यांमधील शेतकऱ्यांना बसला आहे. मुसळधार पावसाने नाले पाण्याने भरून पाणी वेगाने वाहायला सुरुवात झाली व कापणी केलेली भातशेती, शेतातून वाहून गेली असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. साधारणतः पाचशे ते सहाशे एकर भातशेतीला त्याचा फटका बसला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेचा बाऊ न करता शासनाने सर्व गावांमधील शेतीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तर नागोठणे भागातील कोंडगाव ,कातळावाडी ,निडी ,पळस ,शेतपळस ,कडसुरे , वणी ,आंबेघर, वेलशेत ,चेराठी ,वरवठणे, आमडोशी ,वांगणी ,बाळसई ,पाटणसई ,चिकणी, वासगाव ,तामसोली ,हेदवली, ऐनघर ,सुकेळी आदी भागात भातशेतीची मोठी नुकसान झाले आहे.

अवश्य वाचा