नेरळ,ता.22

                                कर्जत तालुक्यात 1990 च्या दशकात मोठ्या प्रमाणात फलोत्पादन योजना राबविली गेली आहे.त्यावेळी लावलेल्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळ यावीत आणि शेतकरी सधन व्हावा यासाठी चर्चा सत्र घेण्यात आले.दरम्यान,या चर्चासत्रात उपस्थित शेतकरी वर्गासाठी आंब्याच्या झाडांना पुनर्जन्म दिला जाऊ शकतो यावर शेतकरी विश्वास ठेवू लागले असून हे चर्चासत्र शेतकरी वर्गाला फलदायी ठरले आहे.

                             आंबा पिकातील तज्ञ म्हणून ओळखले जाणारे आर बी चौगुले यांनी कोकणातील शेतकरी मागील काही वर्षे सातत्याने आंब्याच्या झाडापासून आवश्यक उत्पादन मिळत नसल्याने नाराज असल्याचे दिसून आले आहे.मात्र शेतकऱ्यांची ती नाराजी ही प्रामुख्याने 1990 च्या दशकात लावलेल्या आंब्याच्या झाडांबाबत असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यावेळी फलोत्पादन योजना शेतकऱ्यांनी राबविली होती,मात्र त्यावेळी शेतकरी त्या झाडांची मशागत करीत नसल्याचे आम्हाला दिसून आले होते.त्यावेळी झाडाच्या मुळाशी ज्या मात्रा देण्याची गरज होती,त्यात शेतकरी तज्ञांचे मत घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात कमी पडल्याने उत्पादन कमी मिळण्यास ते झाड कारणीभूत ठरले होते.मात्र त्या सर्व झाडाना देखील मोठ्या प्रमाणात फळे येऊ शकतात हे चौगुले यांनी प्रात्यक्षिक दाखवून समजून सांगितले.त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील, जमिनीतील जुन्या झाडांच्या खोडामधये औषधांची मात्रा द्यावी आणि आपल्या शेतातील आंब्याच्या झाडांमधून पुन्हा नव्या दमाचे उत्पादन घेण्यास सज्ज व्हावे असे आवाहन चौगुले यांनी केले.तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी कृषी विभाग फलोत्पादन योजना राबविण्यासाठी आघाडीवर असून शेतकरी वर्गाने आपल्या जमिनीचे उतारे कृषी सहायक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्यकडे देऊन ही योजना राबवावी असे आवाहन केले.

                        कर्जत तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसेच आर्या आविष्कार हॅपी पर्यटन केंद्र यांच्या विद्यमाने आंबा पिकाबाबत चर्चा सत्र आयोजित करण्यत आले होते.त्यावेळी कृषी क्षेत्रातील खास आंबा पिकावर मोठे संशोधन असलेले तज्ञ आर बी चौगुले हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हजर होते,त्याचवेळी तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे,मंडळ कृषी अधिकारी सरके,कृषी पर्यवेक्षक शिंदे,केणे, आदी प्रमुख उपस्थित होते.त्यावेळी कृषी  पर्यवेक्षक वायसे यांनी या चर्चा सत्राचे प्रस्ताविक केले,तर आर्या आविष्कार हॅपी पर्यटनचे नरहरी थोरवे यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

अवश्य वाचा