चिपळूण

 शहरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉलची तयारी करण्यात येत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल सुरूदेखील करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून चिपळूणमध्ये फटाक्यांच्या स्टॉलची संख्या लक्षणीय असून दिवसेंदिवस त्याच्यामध्ये  वाढ होताना दिसत आहे. हंगामी स्वरूपाच्या या व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले असल्याने आज अनेकजण या व्यवसायाकडे चांगला पैसा मिळवून देण्याचे साधन म्हणून बघत आहेत. याबाबत व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहिले असता विविध प्रकारचे फटाके चिपळूण वासियांना उपलब्ध होताना बेरोजगारांना देखील चांगला व्यवसाय  यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. ही चांगली बाब आहे , मात्र काही वर्षांपूर्वी भर बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या बाजूला फटाक्यांच्या स्टॉलला लागलेली आग यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती ही  बेदखल करून चालणार नाही. त्यावेळी खूप होणारा मोठा अनर्थ समयसुचते मुळे टळला. सध्या बाजारपेठेत उभारले जाणारे फटाक्यांचे स्टॉल यांना आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या संबंधित यंत्रणेकडून घेतल्या जात आहेत की नाही  हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यदाकदाचित काही बाका प्रसंग उद्भवला तर नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा पोचू शकते यासाठी निर्बंध असणाऱ्या सर्व उपाययोजना संबंधित फटाके विक्रेत्यांकडून होणे आवश्यक आहे. अधिकृतरीत्या फटाके स्टॉल धारकांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी आणि कागदपत्रे घेतल्यास असा बाका प्रसंग बुजवण्याची शक्यता नसेल असे  नागरिकांमधून मागणी केली जात आहे. तरी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील फटाके स्टॉल धारकांकडून आवश्यक परवानग्या संबंधित यंत्रणेकडून तपासण्याची आवश्यकता यानिमित्ताने पुढे येत आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाजारपेठेमध्ये असणारी गर्दी, त्यासोबत ऑक्टोबर हिट ,रस्त्याच्या बाजुला थाटलेले फटाक्यांचे स्टॉल या साऱ्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय आवश्यक आहेत.आजूबाजूला अनेक व्यवसाय ,नागरिक आणि रहदारी असल्याने सुरक्षिततेची आज खूपच गरज असल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या वाढणाऱ्या या स्टॉलधारकांनी मुळे काहीठिकाणी फटाक्यांच्या किमतीदेखील मनमानी स्वरूपात आढळून येताना त्याला कोणतेही दरपत्रक नसल्याचे दिसून येत आहे.तरी या साऱ्या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याने सुरक्षितता आणि योग्य दरपत्रक याबाबत आवश्यक त्या खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

 

अवश्य वाचा

रस्त्या केला गिळंकृत