जेएनपीटी दि २१

     पावसाने आपली संततधार शुक्रवार ( दि१९) ते रविवार (दि२०) पर्यंत सुरु ठेवल्याने कणीस धारण केलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.एकंदरीत कापणी योग्य झालेले भात पिक भिजल्याने व जमिनीवर आडवे पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.`

     यावर्षी पावसाने आपली संततधार कायम ठेवल्याने भात पिकाचे उत्पादन कमी प्रमाणात येणार असे शेतकरी वर्गात संबोधले जात आहे. त्यात भाताचे कणीस धारण केलेल्या व कापणी योग्य झालेल्या भातशेतीला सध्या दोन दिवसांपासून सतधार पडणाऱ्या पावसाने झोडपून काढल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. काही ठिकाणी कणीस धारण केलेली भाताची रोपे जमिनीवर आडवी झाल्याने भाताचे उत्पादन कमी होणार या भिंतीने सध्या शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

अवश्य वाचा