२१ ऑक्टोम्बर २०१९

म्हसळा तालुक्यात ह्या आठवड्या पासून  भागात परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. कोकणातील कापणीला आलेले भाताचे पीक मोठ्या प्रमाणात कोलमडून पडले होते. संभाव्य पावसामुळे आणखी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हैरान झाले आहेत. त्याचबरोबर पावसाप्रमाणे रानातील रान डुकरे, अन्य श्वापद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणत सतावत आहे. तर दुसरीकडे पाऊस सतावत आहे. कोकणातील भातशेती आडवी झाली असून, भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतातील उभ्या पिकाचे काढणीचे नियोजन करावे. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी पिके काढली असतील त्यांनी ती पावसापासून सुरक्षित ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा अनेक वर्षानंतर राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे आठवड्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भातशेती पावसामुळे शेतकर्यांनी केलेली मेहनत वाया जाणार आहे. तालुक्यात भात शेती प्रमाणेच नाचणी, वरी, काळे तीळ, तूर , चवळी, उडीत अशी पिके आज जमीन दोस्त झाली आहे. परंतु ह्या परिस्थितीकडे शासनाने पाहणे असे शेतकऱ्यांना वाटत आहे परंतु अधिकारी गुंतले निवडणुकीच्या कामात त्यामुळे पावसाने केलेले नुकसान यांचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणा जाग्यावर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होणार आहे. याविशायाकडे गाभिर्याने लक्ष देणे महत्वाचे आहे. नाही तर तोंडाशी आलेली शेती त्यांचा मोबदला हा न मिळाल्यास शेतकाऱयांपुढे आर्थिक संकट येईल अशी भीती व्यक्त होत आहे.

अवश्य वाचा