मुरूड-जंजिरा

          हा पाऊस आहे की खलनायक ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.दिवाळी 5 दिवसांवर येऊन ठेपली तरी  जुलै प्रमाणे पाऊस पडत आहे.त्यातच विधानसभेची निवडणूक आणि दीपावलीच्या पूर्वतयारीसाठी  सर्वत्र धामधूम सुरू असून पावसामुळे सातत्याने विघ्न येत आहे.

             निवडणूक अतिशय चुरशीची आहे,त्यामुळे मतदान 100% व्हावे यासाठी उमेदवार,कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.पावसामुळे मतदारांना मतदानासाठी कसे आणावे याची चिंता लागून आहे.विकलांग,दिव्यांग मतदारांना आणताना खूप काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.अनेकजण पावसात जाणे टाळतात.त्यामुळे फार मोठी कसरत कार्यकर्त्याना करावी लागेल असे दिसते.

                 दिवाळीच्या फराळाची पूर्व तयारी सुरू असली तरी पावसामुळे वालवणाचे वातावरण नाही. आयत्यावेळी पावसाने खोडा घातल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे. सर्वत्र चिखल साचल्याने रस्ते निसरडे होऊन अपघात घडत आहेत.खड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून दुःखाची झालर आहे.परतीचा पाऊस नक्की कधी जाणार याची काळजी अनेकांना लागून आहे.या वर्षीचा पाऊस खलनायकी भूमिकेतून जात आहे,हे मात्र नक्कीच !

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'