जेएनपीटी दि २० 

 निवडणूक काळात कुठेही शांतता भंग किंवा दहशत पसरू नये यासाठी नवी मुंबई शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने विशेष मोहिम हाती घेतली असून त्यांनी पनवेल येथून तीन आरोपींना शस्त्रांत्रांसह अटक केली आहे. विशेष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन.  बी.  कोल्हटकर यांनी त्यांच्या पथकाने सापळा रचून मुंबई-गोवा हायवे जवळील बॅक ऑफ महाराष्ट्र जवळून सुनील सदाशिव साबळे (वय ४५, रा. करंजाडे), समिर उस्मान खान (वय २७, रा. सुंदरनगर, नेसरी, ता. गडहिंगलज, जि. कोल्हापूर), रितेश रविंद्र नाईक (वय ३०, रा. शाहुनगर, ता. जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) यांच्याकडून तीन बेकायदा पिस्तुलांसह सहा जीवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

निवडणूक काळात दंगा करण्याची त्यांची व्यूहरचना होती काय या बाबत पोलिस तपास करत आहेत. या आरोपींपैकी सुनिल साबळे यांच्यावर मोक्का, खुन आणि खूनाचा प्रयत्न यासारखे ११ गंभिर गुन्हे आहेत तर समिर खान यांच्यावर अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र व अंमली पदार्थ बाळगणे यांसारखे गंभिर गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षख एन.बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर आणि इतर पोलिसांनी ही कारवाई केली.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'