उरण

     विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने दारू विक्रीस बंदी असतानाही उरणमध्ये जादा दराने दारूची विक्री छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत होते. याकडे उत्पादन शुल्क खात्याने जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आम जनतेत सुरू आहे.

     विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन दिवस आधीच दारूबंदीस मनाई केली जात आहे. निवडणुकीसाठी मतदान आज होणार आहे. त्यामुळे रविवार पासूनच दारू विक्रीस मनाई करण्यात आली आहे. आज रविवार आणि उद्या मतदान करायचे आहे, मग मतदारांना दारू मिळाली नाही तर ते मतदान करणार नाही या भीतीनेच उमेदवार व त्यांचे कार्यकर्तेच कुठे दारू मिळते का याचा तपास करीत असतात. त्यावेळी काही ठिकाणी जादा दर आकारात एखाद्या छोट्याशा फटीतून दारूची विक्री करीत असल्याचे पहावयास मिळते. मात्र याचा फायदा दारू विक्रते हुशारीने उचलत बनावट दारूची ओरिजनल दारुच्या नावाखाली सर्रासपणे विक्री करीत आहेत. त्यातून त्यांना इतर दिवसांपेक्षा जास नफा मिळतो. त्यामुळे ज्या दिवशी दारू बंदी असते त्या दिवशी दारू विक्रेत्यांची मज्जा असते.

    इतर वेळी दारुबंदीच्या दिवशी ही उरणमध्ये दारूची छुप्प्या मार्गाने विक्री होत असते. याची तक्रार उरण जेएनपीटी येथे असलेल्या उत्पादन शुल्क कार्यालयाकडे करूनही किंवा तशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध होऊनही कोणतीच कारवाई होत नाही. याबाबत अधिकारी वर्गाना विचारणा केली असता ते सांगतात आम्ही कारवाई करतो, मग जर कारवाई होत असेल तरी हे बंद होण्याऐवजी सुरूच कसे रहाते असा प्रश्न पडतो. 

    याबाबत दारू विक्रेत्यांकडे विचारणा केली असता ते उर्मट उत्तरे देत आम्ही अधिकारी वर्गाना खुश करीत असल्याने ते आमचे काहीच वाकडे करू शकत नसल्याची दरपोक्ती करताना दिसतात. दारू विक्रेत्यांच्या अशा बेताल वागण्यामुळे दारू विक्रते व उत्पादन शुल्क यांचे हितसंबंध असल्याचे उघड होते. काही दारू विक्रेत्यांनी दारू माल ने आण करण्यासाठी दोन-तीन टेंम्पो खरेदी करून गावो गावी माल पोहचविण्याचे काम केले जात आहे. यावरून दारूची विक्री उरणमध्ये किती मोठ्या प्रमाणात होते हे उघड होते. तरी अशा बेकायदेशीर व दारुबंदीच्यावेळीही दारूची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'