जेएनपीटी दि २० 

         १९० उरण विधानसभा मतदार संघात मतदानाची तयारी पुर्ण झाली असून मतदार संघात सर्व मतदान केंद्रावर रविवार दि२० रोजी मतदान यंत्रे आणि कर्मचारी व्यवस्थितपणे पोहचविण्यात आले. उरण विधानसभा मतदार संघात ३२७ मतदान केंद्रावर एकूण २ लाख ९४ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

            या सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोहचविण्यात आले. मतदानाचे साहित्य घेण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी जासई येथिल निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. मतदान साहित्य पोहचविण्यासाठी निवडणूक आयोगाने एस.टी बस, एन.एम.एम.टी बस, खाजगी गाड्या आणि रिक्षांसारख्या वाहनांची सोय केली होती. मतदान सुरळीत पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने १ हजार ८६९ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. ३२७ मतदान केंद्रावर ४५८ व्ही.व्ही. पॅट मशिन, ४०८ सेंट्रल युनिट आणि ४०८ बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी मतदान सुरळीत होण्यासाठी सर्व यंत्रणा चोख ठेवली आहे. उरण विधानसभा मतदार संघात आठ उमेदवार असून खरी लढत अपक्ष उमेदवार महेश बालदी, शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार मनोहर भोईर, शेकाप-आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार विवेक पाटील यांच्यात होणार आहे. या निवडणूकीत १ लाख ४७ हजार ९२५ पुरूष, १ लाख ४६ हजार २२२ महिला व इतर ४असे एकूण २ लाख ९४ हजार १५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'