नेरळ,ता.20

                      माथेरान शहरात येण्यासाठी दस्तुरी  टॅक्सी स्टँड पासून गावात येण्यासाठी दोन तर पुढे तीन किलोमीटर अंतर आहे.त्यामुळे तेथून शहरात येण्यासाठी मिनिट्रेन शटल सेवा स्थानक आहे.ऑगस्ट महिन्यात जास्त पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली त्यामुळे माथेरान मध्ये येण्यासाठीचा महत्वाचा मार्ग बंद असल्यामुळे त्याचा फटका निवडणुकीच्या सामानाला व येथे निवडणुकीच्या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ही बसला आहे. कर्मचाऱ्यांनी मतपेट्या चक्क डोक्यावर ओझ्याप्रमाणे घेऊन माथेरान गाठले.

                              माथेरानशहरात येण्यासाठी घोडे किंवा पायपीट करून यावे लागते.स्थानिकासह पर्यटक ही याला अपवाद नाहीत.आतातर निवडणुकीसाठी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना ही मिनिट्रेन बंद चा फटका बसला.माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी वरून माथेरान शहरात येण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो.तेथून निवडणूकीच कामकाज करण्यासाठी मतपेट्या घेऊन आलेल्या कर्मचार्यांना मतपेट्या चक्क हातामध्ये आणि काहींनी डोक्यावर ओझेवाल्या प्रमाणे घेऊन आपले केंद्र गाठले असल्याने त्यानाही गाडीशिवाय मतदान सामान आणावे लागले.या नियमांपासून शासकीय अधिकारी व कर्मचारी ही वाचले नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये हा विषय चर्चेचा बनला होता.माथेरान मध्ये चार मतदान केंद्र असून ते सर्व साहित्य कर्जत येथून माथेरान पर्यंत न्यायला कर्मचारी वर्गाचे हाल झाले.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'