पंढरपूर

      ‘स्वेरीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च तंत्रशिक्षण घेत आहेत. हा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचाच एक भाग असून शिक्षणासाठीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. एकूणच विद्यार्थ्याना सर्वांगाने शिक्षित करण्याचे स्वेरीचे सुत्र अनुकरणीय आहे. याठिकाणी निर्माण होणारे अभियंते शिक्षणाबरोबरच संस्कारित होवून समाजात ताठ मानेने व स्वाभिमानाने जीवन जगू शकतील याची खात्री वाटते. ही बाब कौतुकास्पद आहे.’ असे मत बेंगलोरच्या कस्टमाईज टेक्नोलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. रामचंद्रन यांनी व्यक्त केले.

         ‘स्वेरी’ संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने बेंगलोरच्या कस्टमाईज टेक्नोलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेडचे आर. रामचंद्रन आले होते. यावेळी त्यांनी स्वेरीच्या शिस्त आणि शैक्षणिक पद्धतीवर समाधान व्यक्त करत गौरवोदगार काढले. प्रारंभी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी आर. आर. रामचंद्रन यांची ओळख करून दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगितले. यावेळी आर. रामचंद्रन यांनी स्वेरीच्या कॅम्पस मधील सर्व विभाग, वसतिगृह, अद्यावत प्रयोगशाळा, वर्कशॉप, संशोधन विभाग, आरएचआरडीएफ मशीन लॅब, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलसह विविध विभागांना भेटी देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. काही वेळ विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून मिळत असणारी सुविधा आणि शैक्षणिक उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. प्रविण कचरे, संशोधन अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'