पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा  सज्ज  झाली आाहे. मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झालेअसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  ढोले यांनी दिली.

            पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 33 हजार 579 मतदार  आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1 लाख 73 हजार 909 पुरुष व 1 लाख 59 हजार 667 स्त्री मतदार तर इतर 3 मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात एकूण 328 मतदान केंद्रे असुन, या मतदाना प्रक्रीयेसाठी  केंद्रावर 1444 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक  नियुक्त अधिकारी व  कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात  आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी दिली.

         मतदासंघात मतदान यंत्रे व बॅलेट युनिट 656, ईव्हिएम कंट्रोल युनिट 328 व व्हिव्हिपॅट युनिट 328 असे बुथ निहाय मतदान साहित्यासह  मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात इाली आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोचवण्यासाठी परिवहन महामंडाळाच्या 48 बसेस तर 5 खाजगी वाहनांचा  वापर करण्यात आला असल्याची माहिती.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'