बेळगाव,दि.२०

                     भारत देश हा वैद्यकीय क्षेत्रातही जगाच्या नकाशावर आला आहे.होमिओपॅथिक डॉक्टरनी औषधांच्या उत्पादन क्षेत्रातही प्रवेश करावा.होमिओपॅथिक डॉक्टरना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन असे उदगार  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी काढले.

                       कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत फौंड्री क्लस्टर येथे  पार पडले.याप्रसंगी मंत्री सुरेश अंगडी बोलत होते. उदघाटन समारंभाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे,व्ही आर एल ग्रुपचे डॉ.विजय संकेश्वर ,डॉ.विरब्रह्माचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ.आर.वाय. नदाफ,सचिव डॉ.सोनाली सरनोबत  यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

                  मंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते बेळगाव शाखेचे उदघाटन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि डॉ सॅम्युअल हेनमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात होमिओपॅथीच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला.मंत्री सुरेश अंगडी यांनी सरकारतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्याची घोषणा केली.उदघाटन कार्यक्रम झाल्यावर होमिओपॅथी तज्ज्ञांचे चर्चासत्र डॉ सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली झाले.या चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.उदघाटन कार्यक्रमाला आणि चर्चासत्राला अडीचशेहून अधिक डॉक्टर उपस्थित होते.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'