नवयुग क्रीडा मंडळ या महिला संघाचे संस्थापक लक्ष्मण कदम यांचे दि. १९ ऑक्टोबर रोनी रात्रौ ११-०० च्या सुमारास दादर येथील रहत्त्या घरी वार्धक्याने निधन झाले. निधना समयी ते ९०वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. कदम यांनी डॉ. रवी बापट यांच्या व शंकरराव (भाई) कालुष्टे यांच्या सहकार्याने नवयुग क्रीडा मंडळ महिला संघाची पताका अटकेपार नेली. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर या संघाचा दबदबा होता. महाराष्ट्राची पहिली महिला छत्रपती पुरस्कार प्राप्त चित्रा नाबर (केरकर), क्राती नाबर, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माया आकरे (मेहेर), विजया शेलार, पद्मिनी गुजर अशा किती तरी नामांकित महिला खेळाडू या संघाने घडविल्या.

     ते भारत पेट्रोलियम या कंपनीत कामाला होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार खूप होता. कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या बरोबर देखिल त्यांनी काम केले होते. बुवांमुळे ते महाराष्ट्र कबड्डीच्या प्रचार आणि प्रसाराकरिता आपल्या परीने आर्थिक मदत करीत असत. ते शिवाजी नाट्य मंदिर या संघटनेवर विश्वस्त होते. आज दुपारी १०-३०च्या सुमारास दादर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर त्यांचा मुलगा संजय यांनी अंत्यसंस्कार केले. त्यावेळी बाळ वाडवलीकर, मनोहर साळवी, मिनानाथ धानजी, शशिकांत राऊत आदी कबड्डी – खो-खो क्षेत्रातील व्यक्ती बरोबर भाऊबंद व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'