अलिबाग

   गेली तीन दिवस रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यानं बळीराजा संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जवळ जवळ परतीचा पाऊसाचा जोर कमी झाल्यानंतर बळीराजा भात पिकांची कापणीला सुरुवात करतो. अलिबाग,पेण, उरण,रोहा,मुरुड, श्रीवर्धन, महाड  येथील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात कापणीला सुरुवात केली.परंतु ऑक्टोबर महिन्यात वाढतं तापमान व निर्सगातील वातावरण होणाऱ्या बदलामुळे गेली तीन दिवस जिह्यात मोठया प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाची कापणी करून ठेवलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चे पत्र जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांना देण्यात येणार आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'