अलिबाग 

जय रोहिदास फांऊंडेशन तर्फे अलिबाग तालुक्यातील चर्मकार समाजाचा जाहीर पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार पंडितशेठ पाटील यांना दिला आहे.

जय रोहिदास फांऊंडेशन तर्फे प्रसिद्धीला देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही माहिती देण्यात आली. त्युनसार सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक होत आहे. सदर निवडणूकीस विविध राजकीय पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. जय रोहिदास फाऊंडेशन  तर्फे  अलिबाग-मुरुड मतदार संघातील  भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सुभाष तथा पंडीतशेठ पाटील  यांना अलिबाग तालुक्यातील  चर्मकार समाजाचा जाहिर पाठिंबा देत आहोत. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जय रोहिदास फांऊडेशनचे विनायक पालकर, संतोष पालकर, मिथुन बेलोसकर, राकेश गोरेगावकर, शरद पुगावकर, नितीन पालकर, नंदू तळकर, नितेश नांदगावकर, मंगेश पालकर, संजोग पालकर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'