अलिबाग 

भर पावसात लाल बावटे फडकवत गगनभेदी विजयी घोषणा देत ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार आमदार पंडीतशेठ पाटील, यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांमध्ये धडकी भरवणार्‍या मोटारसायकल रॅलीने अलिबाग शहरात शेकापक्षाचीच धुम दिसून येत होती. या रॅलीने शहरातील नाक्या नाक्यावर, गल्लोगल्लीत लाल बावटाच दिसत होता. ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत केले जात होते. नाक्या नाक्यावर शहरातील महिलांकडून उमेदवार आ. पंडितशेठ पाटील यांचे औक्षण करुन विजयासाठी शुभाशिर्वादही दिले जात होते. या भेटीत निरुपणकार प्रकाशभाऊ धर्माधिकारी यांची भेट घेऊन आ. पंडित पाटील यांनी आशिर्वाद घेतले. आज प्रचाराची रणुधमाळी संपल्यानंतर आता व्यक्तीगत भेटीवर सर्वच पक्षाचे उमेदवार भर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे.  

अलिबाग शहर शेकाप चिटणीस मंडळातर्फे आमदार सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील यांचा प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील, गटनेते तथा शेकापक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, माजी नगराध्यक्ष सतीश प्रधान, शेकापक्ष पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड गौतम पाटील, उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे, नगरसेवीका वृषाली ठोसर, सुरक्षा शाह, संजना किर, प्रिया वेलकर, शहरचिटणीस अशोक प्रधान, नगरसेवक अनिल चोपडा, सर्व नगरसेवक, शहर महिला आघाडी प्रमुख पल्लवी आठवले, आदी पदाधिकार्‍यांसह हजारो कार्यकर्ते या मोटारसायकल रॅली सहभागी झाले होतेे.

शेतकरी भवन येथे दुपार पासूनच कार्यकर्ते आपपल्या मोटारसायकलवरुन जमा होत या रॅलीसाठी गोळा होऊ लागले होते. मात्र अचानक सुरु असलेल्या पावसामुळे क्षणभर वाटत होते की रॅली रद्द होतेय की काय, मात्र कार्यकर्त्यांच्या प्रंचड उत्साहापुढे भर पावसातही भिजत दुपारी 3.30 नंतर फटाक्यांच्या आतषबाजीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रायगड बाजारहून ठिकरुळ नाका, मठआळी, मधला पाडा, कोळीवाडा, ते शिवलकर नाक्यावरुन ते बारक्याशेट मुकादम यांचे घराजवळून मोहल्ल्यात, तेथून कस्टम बंदराजवळ कोळीवाडयापर्यंत जाऊन पुन्हा पोपटगल्लीवरुन, सिद्धार्थनगर, जुना भाजीमार्केट, पापाभाई पठाण चौक, अलिबाग बाजारपेठ, मारुतीनाका, बालाजी नाका, शिवाजी चौक, अलिबाग एसटी बस स्टॅड, महाविर चौक वरुन ब्राह्मणआळीतून राम मंदिर मार्गे लालबाग, तळकरनगर, रामनाथ त्यानंतर थेट महेश टॉकीज मार्गे चेंढरे मारुती मंदिराजवळून सेंट मेरी हायस्कूलवरुन कच्छिभवन जवळून श्रीबाग आणि त्यानंतर पुन्हा शेतकरी भवन अशा मार्गाने शहरातील प्रत्येक भागात, गल्लीत, नाक्यानाक्यावर रॅलीने फिरुन शेकापक्षाचे शहरातील शक्तीप्रदर्शनच दाखवून दिले.

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'